मराठी भाषा गौरव दिन २०१९

मराठी भाषा गौरव दिन २०१९

FAMT Celebrated Marathi Bhasha Gaurav Din

फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. यामध्ये मराठी साहित्याचे प्रदर्शन ग्रंथस्नेह, रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले. तसेच मराठी साहित्याचे भित्तीचित्र प्रदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २८/०२/२०१९ रोजी दुपारी १२. ३० ते सायंकाळी ५. १५ व दिनांक ०१/०३/२०१९ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५. १५ या वेळेत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे उदघाटन ग्रंथस्नेह, रत्नागिरीच्या सौ. कविता साबणे यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कौशल प्रसाद, रत्नागिरी ज़िल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह श्री. श्रीकृष्ण साबणे व महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत झाले.

“ग्रंथस्नेह, रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या  मराठी साहित्याच्या प्रदर्शनात ललित वाङमय, कादंबरी, कविता, नाटके, आत्मचरित्र अशाप्रकारच्या   साहित्याचे ७०० हुन अधिक ग्रंथ मांडण्यात आले होते.

तसेच मराठी साहित्याच्या भित्तीचित्र प्रदर्शनात प्रसिद्ध मराठी लेखकांची विस्तृत माहिती व निवडक लेख, कविता, म्हणी इ. साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषेतील वाङमय  पोहोचावे व  त्यायोगे त्यांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

सलग दोन दिवस सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला  डीन अ‍ॅकॅडमिक्स व ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद किरकिरे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथपाल श्री महेश भिडे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक ग्रंथपाल श्री विनय कीर, ग्रंथालय सहाय्यक श्री सुहास रावणंग, सौ. प्रतीक्षा नेवरेकर व  ग्रंथालय समितीची विदयार्थी प्रतिनिधी कु प्रणाली तायशेटे यांनी विशेष मेहनत घेतली.

 


Finolex Academy of Management and Technology celebrated the birth anniversary of a renowned Marathi Poet and Jnanapeeth Awardee V.V. Shirvadkar alias Kusumagraj as Marathi Bhasha Gaurav Din on 28 February, 2019.

FAMT held an Exhibition of Marathi Books on this occasion from 28 February to 01 March, 2019 in collaboration with Granthasneh, Ratnagiri. Around 700 books in various genres such as literary writings, novel, poetry, drama were included in the exhibition. A wallpaper exhibition on Marathi literature was also organised.

The programme was inaugurated in the library of FAMT by Mrs. Kavita Sabane (Granthasneh, Ratnagiri) and Dr. Kaushal Prasad (Principal, FAMT).

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download [727.43 KB]

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download [607.55 KB]

 

Loading